Brihan Maharashtra Mandal
 
History (इतिहास)
सतराव्या व अठराव्या शतकात मराठ्यांचे राज्य सर्व भारतभर पसरले होते. श्री शहाजी महाराजांच्या तंजावरकडील स्वान्या झाल्या. आजचे म्हैसुर हेही मराठ्यांनी पूर्वी जिंकले होते. तेथील संस्थानचे बरेच दिवाण मराठी भाषिक होते. राघोबांनी उत्तरेकडे अटकेपार भरारी मारली तर नागपूरकर भोसल्यांनी बिहार, ओरिसा, बंगालकडे स्वा:या करून मराठी राज्याच्या कक्षा रूंदावल्या. यामुळे ग्वाल्हेर, बडोदे, इंदूर, देवास, धार इ. त्या वेळच्या मराठी राज्यांत मराठी माणसे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाली. नंतरच्या शतकांत ब्रिटीशांचे राज्य आले व उद्योग धंध्यासाठी, नोकरी निमित्ताने मराठी माणसे पर प्रांतात जाऊ लागली. त्यांच्या पाच-दहा पिढयांचा जीवन काल तेथेच लोटला.

आपला मराठी बाणा, आपली मायबोली, आपला सांस्कृतिक वारसा परप्रांतात टिकवून ठेवण्याचे कार्य ही मराठी माणसे अनेक वर्षे करीत होती. हे कार्य एकत्रित येऊन संघटने द्वारे करण्याच्या दुष्टिने त्यावेळच्या बांधवांनी महाराष्ट्र समाज अथवा मंडळांसारख्या संस्थांची स्थापना केली. भाषा टिकवून ठेवण्यासाठी मराठी शाळा व ग्रंथालये सुरु केली. शारीरिक बळ व्रुद्धिगंत करण्यासाठी व्यायामशाळा काढल्या. अनेक ठिकाणी मंरे स्थापून भजन, कीर्तन, प्रवचनांद्वारे प्रबोधनाचे कार्य केले.

१९२५ मध्ये कानपुर येथे कांठोस व हिंदुसभा यांची एकाचवेळी अधिवेशने होती त्याचा लाभ घेऊन, कै. तात्यासाहेब केळकर यांनी बृहन्महाराष्ट्र चळवळ संघटीत करण्याच्या दुष्टिने सर्व महाराष्ट्रीय पुढायांना एकत्र आणून बृहन्महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. या सभेस कानपूर, दिल्ली, लखनौ, अहमदाबाद, कलकत्ता, बनारस, झांशी, सागर वगैरे ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या सर्व संस्थांचे कार्य जास्त सूत्रबद्घ करण्यासाठी त्यांच्या समान उद्देश्याबाबत विचार विनिमय व्हावा, मराठी भाषा, संस्कृतीचे संवर्धन व प्रसार व्हावा, मराठा तेतुका मेळवावा म्हणून त्यांचे मेळावे घडवून आणावे या दृष्टीने १९२६ साली बृहन्महाराष्ट्र परिषदेचे प्रथम अधिवेशन झांशी येथे श्री. ज.स. उर्फ तात्यासाहेब करंदीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होऊन बृहन्महाराष्ट्र मंडळ या मध्यवर्ती केंद्रीय संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्थापने पासून अखिल भारतीय स्वरूपाची ५८चे वर अधिवेशने पार पडली आहेत. ह्या अधिवेशनांतून बृहन्महाराष्ट्रातील मराठी लोकांचे प्रश्र सोडविण्याचा प्रयत्न झाला, या संमेलना मधून अनेक थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, समाजपुढारी, राजकीय नेते यांनी वेळोवेळी अध्यक्षता स्वीकारून मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य प्रेमाने भारावलेली मंडळी बृहन्महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्र व मराठी प्रेमा बरोबरच देशप्रेमाचे स्फुलिंगही चेतवीत होती. ही अधिवेशने अनेक प्रांतातून निरनिराळ्या ३० हून अधिक शहरांमध्ये आता पर्यंत झाली. झाशी, कलकत्ता, दिल्ली, ग्वाल्हेर, कानपूर, भोपाळ, हैदराबाद या ठिकाणी ही अधिवेशन दोन वेळा किंवा त्याहून अधिकदा झालीत. १९४० साली कराचीसही संमेलन झाले होते.

बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्ली येथे रजिस्टर्ड असून
संस्थेचा नोंदणी क्र.एस.१३०८/५८-५९ दि. २९.९.१९५८ आहे.
वर्षातून एकदा संमेलने घेऊन स्वस्थ न बसता सततचा संपर्क साधण्याच्या दुष्टिने बृहन्महाराष्ट्र मंडळाने स्वत:चे मुखपत्र प्रकाशित केले. सुरुवातीस 'बृहन्महाराष्ट्र मासिक' या नावाने हे नियतकालिक निघाले. १९३५ मध्ये 'महाराष्ट्र विस्तार' या नावाने नियतकालिक प्रकाशनाची नव्याने सुरुवात झाली. १९६७ च्या रतलाम अधिवेशनांत पुन्हा एकदा बदल होऊन मुखपत्राचे शीर्षक 'मायमराठी' करण्यांत आले. ते सध्या सुरू आहे. या मासिकाचे कामी सर्वश्री पु. दि. जोशी,  कै. भा.रा. खरे, डॉ. पा.वा. सुखात्मे, कै. पु. शे. पतके, डॉ. शं.अ. खरे, कै. के. ना. डांगे, य. वि. नामजोशी, डॉ. बलवंत पाटील, श्री प्रभाकर तेलंग, कै. द. न. पंडीत व अरविंद भंडारी, गोपाळ अगाशे, जी.पी.दातार सह हैदराबादचे बांधव धनंजय कुळकर्णी व कांचन जतकर यांनी वेळोवेळी संपादक पदाचा भार उचलला व बृहन्महाराष्ट्र चळवळीचा झेंडा फडकत ठेवले. सध्या 'मायमराठी' ची व्यवस्थापकीय व संपादकीय जबाबदारी इंदूरचे श्री अश्विन खरे सह बांधवांनी उचलली आहेत.

महाराष्ट्राबाहेर १९२६ पर्यंत सुमारे ५० मराठी संस्था सुरू झाल्या होत्या त्यापैकी इ.स. १९०० पर्यंतच्या काही उल्लेखनीय
संस्था व त्यांचे स्थापना वर्ष पुढील प्रमाणे आहेत:-
  • दत्त मंदीर संस्थान, टिमरनी-अठरावे शतकात, (२) महाराष्ट्र गणेश मंदिर, झाशी-१८५० पूर्वी,
  • अच्युतानंद बल संवर्धक मंडळ, ग्वाल्हेर-१८६०, (४) अच्युतानंद गुरु अखाडा व्यायामशाळा, उज्जैयिनी-१८६८,
  • श्री गणपती मंदिर, इंदूर-१२५ वर्षापूर्वी (६) जयसिंहराव सार्वजनिक वाचनालय, बडोदे-१८७७,
  • हनुमान मंदिर ग्वाल्हेर-१८७८ (८) महाराष्ट्र मंडळ, अजमेर-१८८२
  • दक्षिणी रेल्वे स्कूल, अजमेर-१८८२ (१०) अन्योन्य सहाय्यकारी मंडळी, वडोदरा-१८८९
  • महाराष्ट्र व्यायामशाळा, जबलपूर-१८९०, (१२) महाराष्ट्र समाज रतलाम-१८९०
  • महाराष्ट्र समाज, सागर-१८९३ (१४) महाराष्ट्र नाट्य समाज, जबलपूर-१८९३
  • सारस्वत ब्रह्म समुह, इंदूर-१८९५ (१६) महाराष्ट्र वाचनालय, जबलपूर-१८९५
  • महाराष्ट्र क्लब, (नंतर महाराष्ट्र समाज) जबलपूर-१८९५ (१८) भारत गुणवर्धक संस्था, हैदराबाद-१८९५
  • वैदिक धर्म प्रकाशिका हायस्कुल, हैदराबाद-१८९५. याशिवाय आता अस्तंगत झालेल्या परंतु त्यावेळी अस्तित्वात असलेल्या काही मराठी संस्था होत्या.

एक महत्वाचे प्रकाशन 'बृहन्महाराष्ट्र संस्था परिचय सूची'च्या चवथी आवृत्ती प्रकशित झाली आहे. गेले तीन वर्ष वृहन्महाराष्ट्र मंडळ वार्षिक दिनदर्शिका (मराठी कॅलेंडर) प्रकाशित करत आहे.
कै. ज.स. उर्फ तात्यासाहेब करंदीकर यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षपद १९२५ ते १९४८ पर्यंत भुषविले. नंतर १९४८ ते १९६५ पर्यंत कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी अध्यक्षपद स्वीकारून संघटणेचे नेतृत्व केले. पुढे अध्यक्षपदाची धुरा कै. यशवंतराब चव्हाण यांनी संभाळली. त्यानंतर १९८० पासून १९९१ पर्यंत श्री वसंतराव साठे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. नंतर दोन वर्षे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष केन्द्रीय मंत्री श्री. शरदराव पवार होते. १९९३ ते १९९६ श्री साठे यांनी पुन्हा अध्यक्ष पदाचीं धुरा सांभाळली. नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी अध्यक्ष होते. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस म्हणून १९३९ ते १९५१ पर्यंत श्री पु. शं. पतके यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुढे १९५१ ते १९५६ ते कार्याध्यक्षही होते. त्यानंतर सरचिटणीसाची जबाबदारी श्री ना. र. टिकेकर यांनी सांभाळे. पुढे प्रधान कार्यवाह म्हणून कै. रमेश मुळगुंद यांनी १९७९ पर्यंत सुमारे पंधरा वर्षे चळवळीत जोमोन चैतन्य निर्माण केले.नंतर श्री वा. ग. कुळकर्णी, श्री मु. रा. गोखले, श्री सतीश सोनवळकर, श्री श्रीधर नेवाळकर, श्री चंद्रशेखर गर्गे, कै. उपेन्द्र केळकर व सूर्यकांत कुळकर्णी, अरविंद दीक्षित, शांताराम मोघे, दिलीप कुंभोजकर, संजय कर्णिक , शेखर अमीन् यांनी प्रधान कार्यवाहपदी कार्य केले. सध्या श्री रवि गि-हे- हे पद सांभाळत आहेत. याशिवाय बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यात विशेष सक्रीय राहीले त्यांत कै. बा. वा. गाडगीळ, श्री चिंतामण कांड, श्री ल.रा. पेंढारकर, श्री शंतनु भट, श्री सूर्यकांत कुळकर्णी इ. कार्यकर्ते आहेत. श्री वसंत साठे व सौ. सुनीता काळे, डॉ. मीनाताई पिंपळापुरे, श्री संजय पांडे यांनी कार्याध्यक्ष पद भूषविले आहे. सध्या श्री विलास बुचके कार्याध्यक्ष आहेत. मंडळाची आर्थिक बाजू सांभाळण्याचे कार्य कोषाध्यक्ष म्हणून कै. अनंतराव कठाळे व श्री. राम कठाळे, श्री ज.शं.वाटाणे, श्री शारंगधर भांदक्कर, श्री जी.के.दातार ह्यांनी जपले आहे. सध्या श्री दिलीप कुंभोजकर कोषाध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र शासनातर्फे अधुन मधुन बृहन्महाराष्ट्र मराठी संस्थांना आर्थिक अनुदान दिले जाते. बृहन्महाराष्ट्र मंडळ या बाबतीत महाराष्ट्र शासनास योग्य सल्ला देते व त्यानुसार अनुदानाची रकम ठरविली जाते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ३६ संस्थाना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार देण्यांत आले. जागतिक मराठी परिषदेचे वेळी महाराष्ट्र सरकारतर्फे पुन्हा एकूण रु. २४ लाखांची रकम बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सल्याने संस्थांना देण्यात आली. दरवर्षी रु. एक कोटी किंवा त्याहून अधिकची रकम बृहन्महाराष्ट्रांतील संस्थांना मिळावीम्हणून अंदाज पत्रकांत महाराष्ट्र सरकारने कायम स्वरूपाची तरतुद करावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना सफलता प्राप्त झाली आहे. याचा एक लाभ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्वत: च्या मालकीची वास्तु दिल्लीत घेण्यात आली आहे. वास्तुचा पत्ता १००५६/२, मुलतानी ढांडा, गल्ली नं. २, (बृहन्महाराष्ट्र भवन दुसरी गल्ली). पहाडगंज, नवी दिल्ली - ११ ००५ असा आहे. यामुळे संघटनात्मक चळवळीस कार्यालयीन कामाजी दैनंदिन जोड लाभून अनेक योजना राबविता येतील.

वार्षिक संमेलन व 'मायमराठी' प्रकाशन या उपक्रमांत भर घालून १९९२ पासून नवोदित कलाकारांची शास्त्रीय संगीत स्पर्धा सुरु करण्यांत आली. त्यांत बृहन्महाराष्ट्रांतील अनेक कलाकारांनी भाग घेतला. बृहन्महाराष्ट्रांतील विद्याथ्र्यांसाठी मराठी भाषेच्या चाचणी परिक्षा व उद्योजक जागरूकता शिबीर, हे नवे उपक्रमही सुरु करण्यांत आले आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे प्रांतिक व उपप्रांतिक विभागीय संमेलनेही घेतली जातात. निरनिराûया संस्थांच्या विश्वस्तांचे दोन वेगळी संमेलने घेण्यात आली. तसेच पतपढ्यांपुरते एक संमेलन झाले.

बृहन्महाराष्ट्रांत सुमारे एक हजारहून अधिक निरनिराûया मराठी संस्था, मराठी भाषा व संस्कृती जतन करण्याचे कार्य करीत आहेत. नव्या संस्थांची यात भर पडत आहे.  बृ.म. मंडळाचे दोन हजारहून अधिक आजीव सभासद आहेत. मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण, आपल्या वैशिष्ठ्यांची अन्य प्रांतीयांना ओळख करून देणे, मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करणे, मुला मुलींचे विवाह जुळवणे, मराठी प्रवासंूची सोय करणे, मराठी ठांथालये चालविणे मराठी भाषिकांची सर्वांगीण उन्नती करणे इ. अनेक प्रश्र या संघटणे द्वारे सोडविता येतील. या मध्यवर्ती संस्थेच्या उपयुत्त*तेबद्दल महाराष्ट्रीय वर्ग हळू हळू जागरूक होत आहे. स्थानीय वातावरण व प्रश्रांशी समरस व्हावे हे राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीने उचितच आहे. बृहन्महाष्ट्रांतील मराठी संस्था महाराष्ट्राचे दुतावास म्हणून मुळ संस्कृतीशी जो दुवा साधत आहेत तो राष्ट्रीय भावनेला पोषक आहे. महाराष्ट्रातील शासन व सार्वजनिक संस्थांनी बृहन्महाराष्ट्रांतील संस्थांना सर्वत:हेच्या मदतीचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे झाल्यास मराठी भाषा व संस्कृती जतन करण्याच्या बृहन्महाराष्ट्राच्या कार्यात चैतन्य टिकून राहील.

 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap