Brihan Maharashtra Mandal
 
Activity (कार्य)
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे उपक्रम
वार्षिक कार्यक्रम »
दिल्लीला निवासी व्यवस्था :
बृहन्महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील लोकांसाठी पहाडगंज नवी दिल्लीच्या सदनिकेत निवासी व्यवस्था अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. बीएमएम सदस्यांना निवासी शुल्कात 25% सवलत उपलब्ध आहे. सदनिकेत तीन ए.सी. रुम (पहिला, दुसरा व तिसरा मजला – रोड साईड)  – डबल बेड ज्याला लॅट्रिन बाथरुम संलग्न आहे. तीन नॉन ए.सी. रुम (तिसरा मजला 2रुम व टॉप फ्लोअर 1) कॉमन लॅट्रिन बाथरुम, उन्हाळ्यात कुलर उपलब्ध. डॉरमेट्री संख्या –2, क्षमता एकुण 8 व्यक्ती, शाळा ट्रिपसाठी व्यवस्था. बृहन माय मराठी या नावाने मुखपत्राचे प्रकाशन
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्याचा प्रचार करण्यासाठी, बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभावंत, व्यावसायिक, उद्योजक यांची ओळख निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बृहन माय मराठी या नावाने एक मुखपत्र दर तीन महिन्यांनी इंदूर येथून प्रकाशित केले जाते. संपूर्ण भारतभरात 10000 प्रती वितरित केल्या जातात. सदस्यांना हे मुखपत्र नि:शुल्क वितरीत केले जाते. श्री.अश्विन खरे, इंदूर याचे प्रमुख संपादक आहेत.

मराठी परीक्षा समितीतर्फे परीक्षांचे आयोजन
मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा प्रचार प्रसार करण्यासाठी मराठी भाषा विकास समिती व परीक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. श्री. सुभाष वाघमारे, इंदूर याचे प्रमुख आहेत. समिती तर्फे बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न शहारांमध्ये मराठी परीक्षांचे आयोजन व मराठी निबंध प्रतियोगिता आयोजित केल्या जातात.
या समितीतर्फे बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न शहरात 45 केंद्रांवर परीक्षा व निबंध स्पर्धेचे आयोजन करुन नवीन पिढीला मराठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी केले जाते. अशी केंद्र प्रत्येक प्रांतांच्या शहारांमध्ये सुरु केली जावी तसेच मराठी भाषेच्या प्रचारासाठी महत्वपूर्ण योजना आखण्याचे कार्य करण्याचा मानस आहे.   बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीची वेबसाईट
बीएमएम तर्फे www.bmmmindia.org या नावाने एक बेबसाईट सुरु केली आहे ज्याद्वारे सदस्यांना बीएमएमच्या विभिन्न योजना, उपक्रम, कार्यकारिणी मंडळ यांची माहिती दिली जाते.

अखिल भारतीय संगीत संमेलन – गौरव बृहन्महाराष्ट्राचा
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे बृहन्महाराष्ट्रातील नवोदित कलावंताना पुढे आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. याच माध्यमातून अखिल भारतीय संगीत संमेलनाचे आयोजन दरवर्षी विशाल प्रमाणात केले जाते. संपूर्ण बृहन्महाराष्ट्रात प्रादेशिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेत शास्त्रीय, उप शास्त्रीय, लावणी, पोवाडा, नाट्यगीतांना सादर केले जाते. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या विजेत्यांना पुरस्कृत केले जाते.

वार्षिक अधिवेशन
बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न संस्था व व्यक्तिगत सदस्य यांना एकत्रित करुन विचारांचे देवाण-घेवाण करण्यासाठी दरवर्षी विभिन्न प्रांतात वार्षिक अधिवेशने आयोजित केली जातात. या अधिवेशनात वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन केले जाते. आजपावेतो अनेक महत्वपूर्ण शहरांमध्ये अशा वार्षिक अधिवेशने आयोजित केली गेली आहेत. अशा अधिवेशनात मराठी व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. 2014 चे अधिवेशन भोपाळ येथे आयोजित केले गेले ज्यात मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महोदय व पदेन अध्यक्ष तसेच मा. श्रीमती सुमित्राताई महाजन, लोकसभा अध्यक्षा उपस्थित होते.

प्रांतीय अधिवेशने
मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार-प्रसार संपूर्ण देशात व्हावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ सतत प्रयत्नशील असते. विभिन्न प्रांतात बृहन्महाराष्ट्र मंडळ वर्षातून दोन अधिवेशने आयोजित करीत असते.
वर्तमान कार्यकारिणीने प्रांतीय अधिवेशनाचे स्वरुप बदलवून त्याला त्या प्रांताच्या संस्था व सदस्यांना एकत्रित करुन बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याबद्द्ल माहिती व मराठी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे एक माध्यम बनविले.

प्रतिनिधी संमेलन
बृहन्महाराष्ट्र मंडळ ही संस्था संस्थाची संस्था असल्याने बीएमएम द्वारे संस्थाच्या प्रतिनिधींचे संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनाच्या माध्यमाने संस्थांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

परिचय सूची
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्था, नाट्यसंस्था, शैक्षणिक संस्था, वधू-वर सूचक मंडळे, नियतकालिके यांची माहिती एकत्रित करुन एक परिचय सूची प्रकाशित केली जाते. मागील वर्षी याचे संयोजक श्री. सूर्यकांत कुळकर्णी, कोलकाता यांच्या सहयोगाने परिचय सूची ची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे.  परिचय सूचीत बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न मराठी भाषिक संस्थांचे नाव, पत्ते, फोन नंबर इत्यादी माहिती उपलब्ध केली जाते. परिचय सूची रु.200/- शुल्क देऊन संस्थेकडून प्राप्त करता येईल.

बृहन्महाराष्ट्र मंडळाची दिनदर्शिका
प्रतिवर्षी बृहन्महाराष्ट्र मंडळाची एक दिनदर्शिका काढली जाते. ज्यात मंडळाची आवश्यक माहिती व विभिन्न संस्थांच्या जाहिराती दिल्या जातात.

कार्याचे विकेंद्रीकरण – शहर संपर्क प्रमुख व समिती प्रमुखांची नेमणूक
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी, सदस्यता वृद्धिसाठी व कार्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रांताच्या विभागीय कार्यवाहांच्या कार्यक्षेत्रात महत्वपूर्ण शहरांमध्ये शहर संपर्क प्रमुख नेमण्यात येतात. याशिवाय विभिन्न कार्य चांगल्या प्रकारे केले जावे यासाठी विभिन्न समित्यां बनविण्यात येतात. ज्यात प्रामुख्याने सदनिका निरीक्षण समिती, मराठी भाषा प्रचार प्रसार समिती, महिला प्रकोष्ठ, युवा प्रकोष्ठ, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख, उद्योजक समिती इत्यादी समाविष्ट आहेत.

सल्लागार समितीची नेमणूक
विभिन्न क्षेत्रातील नामांकित मराठी व्यक्तींना तसेच माजी पदाधिका-यांना जोडण्यासाठी सल्लागार समितीची नेमणूक केली जाते.

बृहन्महाराष्ट्र मंडळ स्थापना दिवस – 5 एप्रिल 
बृहन्महाराष्ट्र मंडळाचा स्थापना दिवस 5 एप्रिल रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो. 

कार्यकारिणी बैठक व पदाधिकारी बैठक
कार्यकारिणी आपल्या कार्यात तत्परता दाखविण्यासाठी कार्यकारिणीच्या व पदाधिका-यांच्या बैठकी घेऊन निर्णय घेत असते.

महिला मंडळ, युवक मंडळ व उद्योजक मंडळाची स्थापना

बृहन्महाराष्ट्राच्या सदस्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संस्थेच्या महिला, युवक व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा मानस आहे यासाठी मंडळाने महिला मंडळ, युवक मंडळ व उद्योजकांचे मंडळ स्थापित केले आहे.

महाराष्ट्र पर्यटन
विकास मंडळ (एमटीडीसी), महाराष्ट्र शासनातर्फे सुट

बीएमएमच्या सदस्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी निवासी व्यवस्थेत 25% सवलत दिली जाते. 

सर्व निवासी संस्थाच्या सदस्यांना नवी दिल्ली सदनिकेत सवलत 

बृहन्महाराष्ट्रातील निवासी संस्थांच्या सदस्यांना बीएमएमच्या नवी दिल्ली येथील सदनिकेत 25% सवलत दिली जाते तसेच बीएमएमच्या सर्व सदस्यांना बृहन्महाराष्ट्रातील निवासी संस्थांतर्फे सुध्दा अशीच 25% सवलत दिली जाते. या माध्यमाने बृहन्महाराष्ट्रातील सर्व निवासी संस्था व सदस्य एकत्र येतील तसेच सर्वच सदस्यांना याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. आपणांस नम्र निवेदन आहे की आपण मराठीच्या प्रेमापोटी या संस्थेच्या विकासासाठी आपली आर्थिक मदत जाहिरात अथवा देणगीच्या स्वरुपात द्यावी.
धन्यवाद. विलास बुचके (कार्याध्यक्ष ), रवि गि-हे (प्रधान कार्यवाह)
 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap