Brihan Maharashtra Mandal
 
About Us (परिचय)
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचा परिचय व कार्य

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याचा विस्तार देशभरात व्हावा, बीएमएमची स्थापना, उद्देश व कार्याची माहिती सर्वांना व्हावी, तसेच मराठी भाषा, संस्कृती व परंपरेची जोपासना व्हावी असा आमचा मानस आहे. आमची संस्था अखिल भारतीय स्तरावर कार्य करीत असून संस्थेचे कार्य, उद्देश व प्रकल्प आपणांसमोर यावेत व संस्थेची माहिती आपल्यापुढे यावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा परिचय व कार्य थोडक्यात आपल्यासमोर प्रस्तुत आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली
ही संस्था रजिस्टर्ड असून संस्थेचा रजिस्टर्ड क्र.1308/1958-59 दि.29.09.1958 असा आहे. संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नवी दिल्ली येथे 10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, पहाडगंज, नवी दिल्ली 110055 येथे आहे.

संस्थेचा उद्देश व कार्य
मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा प्रचार-प्रसार करणे, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न मराठी संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्यासाठी त्यांना सदस्यत्व देणे. अशा संस्थांना मार्गदर्शन करणे, मराठी भाषेच्या विभिन्न स्तरात परीक्षांचे व निबंध प्रतियोगितेचे आयोजन करणे, मराठी भाषेचे मुखपत्र प्रकाशित करुन विभिन्न संस्थाच्या गतिविधींची माहिती प्रकाशित करणे, बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न प्रांतातील मराठी भाषिक संस्था व सदस्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रांतीय अधिवेशन आयोजित करणे, वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थागत व आजीवन सदस्यांना एकत्रित करणे, मराठी संस्था व मराठी व्यक्त/उद्योजक यांचा सन्मान/सत्कार करणे.

सदस्यता संख्या व बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न संस्था
आजीवन सदस्य 4500,  संस्थागत सदस्य 191, संरक्षक सदस्य 19
बृहन्महाराष्ट्रातील एकुण संस्था:
उत्तर भारत – दिल्ली 23, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 2, पंजाब 2, उत्तर प्रदेश 20
उत्तरांचल – देहरादून 1, हरिद्वार 2
मध्यप्रदेश – भोपाळ/विदिशा 17, खंडवा/खरगोन 7, इंदूर/महू/धार 31, देवास/उज्जैन/रतलाम 16, बैतूल 1, होशंगाबाद/इटारसी/हरदा 5,  शुजालपुर/राजगढ 5,सागर/बीना 5, ग्वाल्हेर/गुणा 21, जबलपुर 12, अन्य 69,
छत्तीसगढ – 49 ; राजस्थान – 12 ; गुजरात 100, दमण -1, गोवा 20
आंध्रप्रदेश 30, केरळ 1 ; कर्नाटक – 40, तामिलनाडू – 16, बिहार – 6, ओडीशा – 4

पश्चिम बंगाल – 17; अंदमान निकोबार – 2
नाट्यसंस्था : मध्यप्रदेश – 24 ; गुजरात – 9 ; गोवा – 32 ; आंध्रप्रदेश 4 ; कर्नाटक – 4
छत्तीसगढ – 2 ; उत्तरप्रदेश – 2
ग्रंथालय – 15   नियतकालिके (मासिक/साप्ताहिक/त्रैमासिक/वार्षिक – 71
धार्मिक स्थळे ;106 ;सहकारी संस्था :45 ; गृहनिर्माण संस्था :7 ;  वधु-वर संस्था : 30
शिक्षण संस्था : 122
अशाप्रकारे वरील सर्व संस्था बृहन्महाराष्ट्राशी जोडलेल्या असून त्यांच्या सदस्यांची एकुण संख्या जवळपास 5000 च्या वर आहे.

कार्यकारिणी मंडळ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. वर्तमान काळात मा. श्री. देवेंद्र फडणवीस हे या संस्थेचे पदेन अध्यक्ष आहेत. अ‍ॅडव्होकेट श्री.विलास बुचके - कार्याध्यक्ष, श्री. शेखर कीबे – उपाध्यक्ष, डॉ. रवि गि-हे ्रधान कार्यवाह, श्री. सुधीर परेतकर – कार्यवाह व श्री. दिलीप कुंभोजकर – कोषाध्यक्ष व श्री. दिपक कर्पे-सहकोषाध्यक्ष असून प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व विभागीय कार्यवाह करीत असतात.
 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap