Events

1. अखिल भारतीय मराठी परीक्षा व निबंध पुरस्कार वितरण कार्यक्रम इंदूर येथे थाटात संपन्न 

2. कार्यक्रमात राज्य मराठी विकास संस्था, मुंबई (महाराष्ट्र शासन) चे प्रभारी संचालक श्री. आनंद काटीकर व कार्यासन अधिकारी श्री. गिरीश पतके उपस्थित होते. 

3. मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धा यावर परीक्षा केंद्रप्रमुख, परीक्षक व बीएमएम पदाधिकारी यांची राष्ट्रीय बैठक इंदूर येथे संपन्न. या प्रसंगी राज्य मराठी विकास संस्थेचे उच्च पदाधिकारी उपस्थित होते. 

4.पुढील अखिल भारतीय मराठी परीक्षांचे स्वरुप बृहद होणार. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई (महाराष्ट्र शासन) व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली संयुक्त रुपाने या परीक्षा आयोजित करणार. 

5. मराठी भाषा व निबंध स्पर्धेत सहभागी बृहन्महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुरस्कार राशीत वाढ, स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रांचा लाभ मिळणार. पुरस्कृत विद्यार्थ्यांना अनेक सवलती व लाभ मिळणार. 

6. राज्य मराठी विकास संस्था मराठी परीक्षा आयोजनासाठी अर्थसहाय्य करणार.   

7.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न संस्थांना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अर्थसहाय्य योजना पुढील वर्षी सुध्दा मिळणार. नोटीफिकेशन वेबसाईट वर प्रकाशित केले जाईल. 

8. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पुढील एक दिवसीय प्रांतीय अधिवेशन उत्तर प्रदेश येथे महाराष्ट्र समाज आग्रा तर्फे दि.23 जुलै 2017 रोजी केले जाणार. 

9. बृहन्महाराष्ट्रातील ज्या संलग्न संस्थागत संस्थांना वर्गणी देऊन 15 वर्ष पूर्ण झाली असतील त्यांनी आपली सदस्यता पुन्हा रिन्यू करावी ही विनंती.

10. बृहन माय मराठीचा एप्रिल 2017 चा अंक प्रकाशित (माय मराठी कॉलम मध्ये बघावे)


 
 
सूचना :
1. महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 


धन्यवाद.
डॉ. रवि गि-हे महासचिव

आपण येथे दस्तऐवज डाउनलोड करू शकता
Download

विलास बुचके - कार्याध्यक्ष
09303135972
buchkevilas@yahoo.com
  डॉ. रवि गि-हे प्रधान कार्यवाह
09850396080
ravi.girhe@yahoo.com
 
प्रशासकीय कार्यालय
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली

१००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिस 
स्टेशन समोर ,पहाडगंज, 
नवी दिल्ली – ११००५५

 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap